मुंबई (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी बौद्ध भिक्षुंना श्रीलंकेतून घेऊन येणारं विमान कुशीनगरमध्ये उतरले. मोदी यांनी,  भारत जगभरातील बौद्ध समाजाच्या प्रेरणेचं केंद्रस्थान आहे. फक्त पर्यटनाला प्रोत्साहन देणं एवढाच विमानतळाचा उद्देश नाही तर यामुळे शेतकरी आणि इतर व्यवसायाला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, येत्या तीन वर्षात देशात २०० हून अधिक विमामनतळांचे नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्वांचल आणि बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी हे विमानतळ महत्त्वाचे आहे. भारत हा बौद्ध धर्माच्या आस्थेचे केंद्र आहे. या आस्थेला, श्रद्धेला ही पुष्पांजली असल्याचे मोदी म्हणाले.

तसेच कुशीनगरचा विकासाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. उड्डाण योजनेंतर्गत गेल्या काही वर्षात ९०० हून अधिक नव्या मार्गांना परवानगी दिली आहे. तसंच यामध्ये ३५० पेक्षा जास्त हवाई सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. ५० पेक्षा अधिक एअरपोर्ट पहिल्यांदा सेवेत नव्हते ते सुरु केल्याचे, पंतप्रधान मोदींनी सांगितले.