अटक करायला, मी काय साधा माणूस वाटलो का ? : नारायण राणे

0
804

चिपळूण (प्रतिनिधी) : मी कोणताही गुन्हा केलेला नाही,  तुम्ही तपासून पाहा. नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार. गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे. मी काय साधा माणूस वाटलो का ? ,  अशी विचारणा नारायण राणे यांनी केली. माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांना दिला. ते चिपळूण मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

राणे म्हणाले की, मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. नाशिकच्या आयुक्तांनी काढलेलं लेटर आणि नोटीसमध्ये फरक आहे. तो काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. कोण शिवसेना?  एखाद्या नेत्याचं नाव सांगा. कोण बडगुजर मी त्यांना ओळखत नाही, असा टोलाही राणे यांनी गुन्हा दाखल झाल्यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना लगावला.  मी प्रसारमाध्यमांच्या बातम्यांवर विश्वास ठेवणार नाही.  माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही. गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही,  असेही ते म्हणाले.