कोल्हापूर (प्रतिनिधी) : बेंगलोर मधील तिरुपती कॉर्पोरेशन अँड जीवन संजीवनी सामाजिक संस्थेच्या वतीने संपूर्ण राज्यभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक व शैक्षणिक मदत करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ही मदत देण्यात येणार असून पात्र नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रमुख विकास बांदल यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केले.

त्यासाठी योग्य कागदपत्रासह अजित सुर्वे ‘ई’ वार्ड, उलमे मळा, कसबा बावडा तसेच राघव पाटील ७६११९६८८८८ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना १० ते ५० हजारापर्यंत मदत, मुलांची एक वर्षाची शैक्षणिक फी आणि परिवाराला तीन लाख रुपये किंमतीचा वैद्यकीय मेडिकल क्लेम (इन्सुरन्स) देण्यात येणार आहे. त्यासाठी मृत्यू झालेल्या रुग्णाचे आधार कार्ड, मृत्यू दाखला, वारसाचे आधार कार्ड, वारसाचे बँक पासबुक झेरॉक्स, फोटो अशी कागदपत्रे आवश्यक आहेत.

या पत्रकार परिषदेला अजित सुर्वे, दिपा गवंडी उपस्थित होत्या.