‘त्या’ विधानावर तीरथ सिंह रावतांचा खुलासा

0
91

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत  यांनी  फाटकी जीन्स घालून फिरणारी महिला कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे.  परंतु आपली भूमिका कायम ठेवत त्या विधानाचा पुनरूच्चार करताना ते म्हणाले की,  महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही, पण फाटक्या जीन वापरण्याला विरोधच आहे. 

तीरथ सिंह रावत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपला महिलांनी फाटक्या जीन्स वापरण्याला विरोध कायम आहे. माझा महिलांनी जीन्स वापरण्याला विरोध नाही. पण, फाटक्या जीन्स वापरण्याला माझा विरोधच आहे.  

फाटलेली जीन्स घालून महिला फिरते. लोकांना भेटते. अशा महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करतात. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असे नव्हते.  तरुणांमध्येही व्यसन वाढत चाललं आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावं लागेल, असे रावत यांनी म्हटले होते.