अजित पवारांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ : भाजप नेत्याचा सूचक इशारा   

0
151

मुंबई (प्रतिनिधी) : अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही आणि ते कधी होणार पण नाहीत. तसेच त्यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळाले होते पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार, अशी चर्चा आहे, त्यामुळे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली आहे, असा खोचक टोला भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत लगावला आहे.

राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चांचा संदर्भ देत निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होणार असल्याचे संकेत ट्विटवरुन दिली आहे. अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता २ उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे म्हणजे अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असेही राणे यांनी म्हटले आहे.