मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी ‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खान यांचा पुत्र आर्यन खान याला २ ऑक्टोबरला एनसीबीच्या पथकाने अटक केली आहे. त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे त्याची आई गौरी खान पुत्र वियोगाने व्याकुळ झाली आहे. शाहरुख खान आणि गौरी खानला मुलाच्या काळजीमुळे झोप देखील लागत नाही. तर गौरी खानने आपल्या मन्नत घरातील स्वयंपाकघर कर्मचाऱ्यांना जोपर्यंत आर्यन घरी येत नाही, तोपर्यंत गोडधोड न करण्याचा आदेश दिला आहे.

ईद आणि दिवाळीत मन्नतमध्ये उत्साहाचे वातावरण असते. आकर्षक रोषणाईने मन्न्त उजळलेली असते. पण यावेळी शांततेचे वातावरण आहे. त्यातच गौरी खानने जोपर्यंत आर्यन तुरुंगातून सुटत नाही, तोपर्यंत स्वयंपाकघरात काहीही गोड पदार्थ शिजवले जाणार नाहीत, अशा सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, लंच मेनूमध्ये खीर तयार केली जात होती. त्यानंतर, गौरी खानने ताबडतोब कर्मचाऱ्यांना खीर बनवणे बंद करायला लावले आणि प्रत्येकाला आदेश दिला की, जोपर्यंत त्यांचा मुलगा आर्यन याला जामीन मिळत नाही, तोपर्यंत या स्वयंपाकघरात मिठाई बनवली जाणार नाही. दरम्यान, आर्यनच्या सुटकेसाठी त्याच्या वकिलांनी जामीन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण आर्यन खानला अद्याप जामीन मिळालेला नाही.