गडहिंग्लजमध्ये ३१ डिसेंबरसाठी कडेकोट बंदोबस्त…

0
295

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  आज ३१ डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस. यावेळी अनेक ठिकाणी मौजमस्ती, पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. तसेच गडहिंग्लज येथे हॉटेल व्यवसायिकांनी अनेक ऑफर दिल्या असून आपल्याकडे ग्राहक कसे आकर्षकीत होतील याची चडाओढ सुरू आहे. मद्यप्राशन करून करून वाहनधारकांनी गाड्या चालवू नये यासाठी गडहिंग्लजमध्ये ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज रात्री ११ पासून प्रत्येकाची ब्रेथ अॅनालायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी देखील जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. असून नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.