कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कडेकोट बंदोबस्त…

0
99

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आज (रविवार) होळी पौर्णिमेनिमित्त कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पौर्णिमेला या ठिकाणी गर्दी होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नृसिंहवाडी देवस्थान कमिटीने शिरोळ पोलीस स्टेशन, होमगार्ड आणि वजीर रेस्क्यू फोर्सने याठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता. यावेळी गेल्या एक महिन्यापासून मंदिर परिसरात मास्क, सॅनिटाईझर वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. विना मास्क कोणालाही मंदिर आवारात प्रवेश दिला जात नाही. नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून रांगेतूनच दर्शन घेण्याचे आव्हान पोलीस, रेस्क्यू फोर्स करताना पहावयास मिळाले. तसेच नागरिकांनी आपली खबरदारी घ्यावी, अशी सूचना देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.