शिर्डी : येथील साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक आणि फुल विक्रेत्यांमध्ये आज झटापट झाली. साई मंदिरात हार, फुले आणि प्रसादावर बंदी घालण्यात आली आहे. याविरोधात मंदिर परिसरातील हार, फुल आणि प्रसाद विक्रेते आक्रमक झाले. त्यांनी आज आंदोलन केले. साई मंदिरात हार, फुले प्रसादावरील बंदी उठवण्याची मागणी विक्रेत्यांनी केली. गेल्या १० महिन्यांपासून ही बंदी घालण्यात आली आहे.

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर स्थानिक हार, फुल विक्रेत्यांचा रोजगार अवलंबून आहे. नेमके मंदिर प्रशासनाने यावर बंदी घातल्याने स्थानिक विक्रेते अडचणीत आले आहेत. यावरून आंदोलन करत विक्रेते आणि संस्थानच्या सुरक्षा रक्षकांमध्ये आज वादा झाला. आंदोलकांना सुरक्षा रक्षक आणि पोलिसांनी रोखले. हार, फुले देखील सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतली. यावेळी दर्शन रांगेत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

हार, फुलांवरील बंदी उठवावी, यासाठी कोपरगाव येथील कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी असा १८ किलोमीटर पायी प्रवास करून मंदिरात फुले घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनाही पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी फुले घेऊन जाण्यास मज्जाव केला. साई संस्थानच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा काळे यांनी यावेळी दिला. शिर्डी येथील कार्यकर्ते दिगंबर कोते हेदेखील याच मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या आंदोलनाला हार, फुल विक्रेत्यांनी पाठिंबा दिला आहे. प्रशासनाने अद्याप त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली