इचलकरंजी येथे चोरट्याकडून तीन मोटारसायकली जप्त…

0
22

इचलकरंजी (प्रतिनिधी) : मोटरसायकल चोरी करणाऱ्या एका रेकॉर्डवरील चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. रमेश लगमाण्णा पाटील (वय ३२, मूळ रा. गडहिंग्लज, सध्या रा. इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून ९७ हजारांच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

गुन्ह्याच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार रमेश पाटील याच्याकडे शिवाजीनगर पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मोपेड, दुचाकीसह शिवाजीनगर हद्दीतील एक मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले. तसेच डिसेंबर २० मध्ये कोल्हापूर येथील हॉटेल प्रार्थना समोरून एक मोपेड वाहन चोरी केल्याचेही कबूल केले. त्याच्याकडून ९७  हजारांच्या तीन मोटारसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

हा कारवाई सागर चौगले, सुनील बाईत, गजानन बरगाले, सतीश कुंभार, विजय माळवदे, प्रवीण कांबळे, आशुतोष शिंदे यांनी केली.