बनावट सातबाराप्रकरणी तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न

0
68

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मिळकतीचा बनावट ७/१२ उतारा काढून फसवणूक केल्याप्रकरणात न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन तिघाजणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील महादेव जवाहिरे यांनी यशवंत गणपती भालकर (वय ८० ), मारुती गणपती भालकर (५४), उमाजी यशवंत भालकर (वय ४०) सर्व रा. आरकेनगर रोड पाचगाव या तिघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  यशवंत भालकर, मारुती भालकर व उमाजी पालकर या तिघांनी २६ जानेवारीरोजी सकाळी नऊच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिसा नंबर १५/८ या मिळकतीचे तयार केलेला बोगस सातबारा उतारा याबाबत न्याय मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जवाहिरे यांनी यशवंत भालकर, मारुती भालकर व उमाजी भालकर या तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.