संदीप मागाडे खून प्रकरणी मुख्य सूत्रधारासह तिघांना पोलीस कोठडी

0
116

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कबनूर येथील संदीप मागाडे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार कुमार कांबळेसह तिघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. कुमार कांबळे, संकेत अनिल शिंदे व राकेश शिंदे यांना पोलिसांनी आज (सोमवार) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात  हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कबनूर येथील संदीप मागाडे खून प्रकरणी कांबळे व त्याच्या साथीदारांना आज दुपारी इचलकरंजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे हे समजताच मागाडेच्या नातेवाईकासह मित्रमंडळींनी न्यायालय आवारात आरोपींच्या निषेधासाठी गर्दी केली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी समयसूचकता दाखवून या संशयितांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर केले. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मागाडे खून प्रकरणातील आतापर्यंत ११ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्य काही जण फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.