कळे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील कळे येथे बेकायदेशीरपणे गुरे कत्तल करण्यासाठी नेत असता कळे पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. रवी सिद्धाप्पा नाईक (वय २७), चेतन श्रीशैल नाईक (वय १९) हे दोघे रा. (वडरहट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव) आणि अल्ताफ बापूल शेख (वय २२, रा. ऐनापूर, ता. अथणी) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हे तीनही आरोपी ४ गायी, ३ कालवडी, आणि ३ खोंडांना कत्तलीसाठी टेम्पोतून नेत होते. यावेळी पोलिसांनी या आरोपींकडून टेम्पो क्र. केए २३ बी ३८५० आणि जनावरे असा एकूण १० लाख ६० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्यानंतर या गायी कणेरीमठ येथील गोशाळेत पाठवण्यात आल्या. तसेच आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र गोरक्षक प्रमुख बंडा साळुंखे, तुकाराम मांडवकर, भार्गव भाळवणे, युवराज पाटील, अमोल नाईक, सूरज पाटील, प्रवीण मांडवकर, मयूर जाधव, संजय माळी, सिद्धार्थ कथकधोंड, सागर साळोखे, दीपक देसाई, बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.