मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअप मेसेज पाठवून एका अज्ञाताने धमकी दिली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मिलिंद नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून यासंबंधी तपास सुरू आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआय चौकशी करायला लावू, अशी धमकी या व्यक्तीने मेसेजमध्ये दिली आहे.  थेट मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांनाच धमकी देण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करणार आहे.