बार्शीतील आमदारासह नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

0
57

सोलापूर (प्रतिनिधी) : बार्शी येथील भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांना फेसबुक लाइव्ह करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकऱणी पनवेलमधील नंदू उर्फ बाबा पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र राऊत यांच्या समवेत नगरसेवक अमोल चव्हाण यांनादेखील धमकी देण्यात आली आहे.

तुम्ही मुंबईत आल्याचे समजले, तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही. भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण केले किंवा त्यांच्या केसाला जरी धक्का लागला, तर गाठ माझ्याशी आहे. तुम्हाला जिवंत सोडणार नाही आणि तुम्हाला ओपन चॅलेंज करत आहे, अशा शब्दांत राजेंद्र राऊत यांना धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा सोलापूर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.