टोप (प्रतिनिधी) : शिरोली पुलाची येथील पंचवटी हॉटेलमध्ये बिलाच्या कारणावरून मालकाला मारहाण करून अॅटरोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे पाचजणांवर शिरोली पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथील फाट्यावर असणाऱ्या पंचवटी हॉटेलमध्ये बिलाच्या कारणावरून मालक यश धनाजी हांडे (वय ३०, रा. शिरोली पुलाची) यांना रोहीत बाजीराव सातपुते, विशाल कांबळे, गुंड्यारा आणि अन्य दोघांसह पाचजणांकडे हांडे यांनी बिलाची मागणी केली.

यावेळी यांनी बिल देणार नाही, तुझ्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅटरोसिटीचा गुन्हा दाखल करतो असे धमकी दिली. तसेच यश हांडे यांना दगड, विटाने मारून जखमी केले. याप्रकरणी शिरोली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.