नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली. तेव्हा सपा पराभूत,  डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हारले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव,  अशा शब्दांत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर तोफ डागली.  

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. हाती आलेल्या निकालानुसार एनडीए पुन्हा सत्तेवर येण्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यातच भाजपाने काँग्रेसवर  निशाणा साधला आहे.

सुरूवातीला महाआघाडीने मुसंडी मारली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये एनडीएने मुसंडी मारली असून आघाडी कायम ठेवली आहे. एनडीएची जोरदार आगेकूच सुरू असून  बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, सुरूवातीच्या कलांमध्ये महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत होते. मात्र, मतमोजणीच्या फेऱ्या वाढताना महाआघाडी  पिछाडीवर पडली आहे.