उत्तराखंड (वृत्तसंस्था): उत्तराखंडमधील हरिद्वारची सृष्टी गोस्वामी  उद्या (रविवार) रोजी एका दिवसाची मुख्यमंतत्री होणार आहे. २४ जानेवारी हा राष्ट्रीय कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त सृष्टीला ही संधी देण्यात आली आहे.याला मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मंजुरी दिली आहे. देशामध्ये ही अशी घटना पहिल्यांदाच घडत आहे.

उद्या हरिद्वारमधील दौलतपूर गावाचे नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाणार आहे.यावेळी सृष्टी ही एक मुख्यमंत्री म्हणून विविध विकासकामांचा आढावा घेणार आहे. शिवाय बारा विभागातील अधिकारी, त्यांच्या विभागातील योजनांबाबतचे पाच  मिनिटांचे प्रेझेंटेशन तिच्यासमोर करणार आहेत.