शिवसेनेचा यंदाचा दसरा महोत्सव ‘ऑनलाईन’…

मुंबई (प्रतिनिधी) : येत्या २५ ऑक्टोबरला होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित असतात. मात्र, कोरोनामुळं यंदा दसरा मेळावा होणार नाही, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा हा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा मोठी आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दसरा मेळावा धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे होणारी गर्दी लक्षात घेवून हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Live Marathi News

Recent Posts

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेचा कॅन्सरग्रस्तांना मदतीचा हात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वारणानगरमध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु…

7 hours ago