हमिदवाडा (प्रतिनिधी) : गोरंबेतील एका महिलेच्या खुनाचा छडा कागल व निपाणी पोलिसांनी दोन महिन्यानंतर दि. १८ शुक्रवारी लावला. ही संपूर्ण घटना मोबाईलमुळे उघडकीस आली.

मिळालेली माहिती अशी, हे खून प्रकरण ज्या मोबाइलमुळे उघडकीस आले, तो मोबाईल गीता शिरगावकर यांचा होता. खून केल्यानंतर संशयिताने तो मोबाईल नंबर आपल्याजवळ ठेवून स्विच ऑफ केला होता. थोड्या दिवसानंतर तो मोबाईल एका दुकानदाराला विकला होता. त्या दुकानदाराने तो मोबाईल दुसऱ्या माणसाला विकला. त्या माणसाने मोबाइल विकत घेतल्यानंतर तो चालू केल्यानंतर त्याच्या कोडवरूनच पोलिसांना याचा सुगावा लागल्याचे बोलले जात आहे. तसेच संशयितांनी आणखीन एक कहरच केला होता. मयत गीता शिरगावकरचा मृतदेह ज्या खड्ड्यांमध्ये पूरला होता. त्या शेतातील शेतमालकाकडे या संशयितांनी शेतामध्ये खत टाकण्याच्या बहान्याने आम्हाला काम द्या. आम्हाला काम नाही म्हणून शेत मालकाकडून खत टाकण्याचे काम मिळवून त्या जागेवर जाऊन मृतदेहाची परत पाहणी केल्याचे देखील उघडकीस आले आहे.

मृत गीता शिरगावकर ही गोरंबेची असून तिचा विवाह कोगे ता. करवीर येथील युवकाशी अठरा वर्षांपूर्वी झाला होता. तिला मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. गीताचे बऱ्याच वर्षापासून गोरंबेतील सागर शिरगावकर याच्याशी प्रेमसंबंध होते. सहा महिन्यापूर्वी तिने पती व मुलांना सोडून सागरसह विवाह केला होता. चार महिने गीता व सागर गोरंबेत रहायचे. सागरचे पहिले लग्न झाले असून त्यालाही अपत्ये आहेत. विवाहानंतर सागर व गीतांमध्ये कलह व्हायचा. एका रात्रीत गीता बेपत्ता झाल्याची फिर्याद दोन महिन्यापूर्वी स्वतः सागर यांनी कागल पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू होता.

त्यानुसार पोलिसांनी संशयावरून बसव सर्कल परिसरातील हनुमान मंदिरा मागे राहणाऱ्या २२ आणि ३२ वर्षीय दोन युवकांना ताब्यात घेऊन घेऊन चौकशी केली. या वेळी त्यांनी गीताचा खून करून पुरल्याचे सांगितले. या दोघांनाही पोलिसांनी घटनास्थळी फिरवून अधिक माहिती घेतली. दुपारी एकपासून सायंकाळी उशिरापर्यंत कार्याला निपाणी येथील बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी थांबून होते. दोन महिन्यापूर्वी खून झाल्याचे वैद्यकीय पथकालाही पाचारण केले होते.