धनंजय मुंडेंवरील आरोपावर पंकजा मुंडेंनी दिली पहिल्यादांच प्रतिक्रिया  

0
540

औरंगाबाद (प्रतिनिधी) : भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांबद्दल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्या औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.  

पंकजा मुंडे म्हणाल्या की, तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे. नैतिकदृष्ट्या, तात्विकदृष्ट्या आणि कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचे समर्थन मी करु शकत नाही. पण कोणत्याही अशा गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला आणि ज्यांचा काही दोष नाही अशा कुटुंबातील लहान मुलांना त्रास होऊ शकतो. मी महिला बालकल्याण मंत्री राहिली आहे. एक नातं आणि महिला म्हणून याकडे मी संवेदनशीलतेने पाहते. हा विषय कोणाचा जरी असता तरी मी त्याचे राजकीय भांडवल केले नसते, आजही करणार नाही. संवेदनशीलता दाखवून मीडियाने त्यांच्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी. भविष्यात यासंबंधी निकाल लागेलच, असेही त्यांनी सांगितले.