आलास येथे बंद घराचे कुलुप तोडून ४८ हजार रुपयांच्या मुद्देमालांवर चोरट्यांचा डल्ला…

0
20

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  शिरोळ तालुक्यातील आलास येथे रामनगर येथील हुजरे यांच्या घरतील रोख रक्कम आणि चांदीची ४८ हजारांची भांडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. तसेच शेजारीच असलेल्या पशुखाद्य दुकानातही चोरीचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या घटनेमुळे आलास-बुबनाळ गावात खळबळ उडाली आहे. याची फिर्याद श्रीपाल धनचंद्र मगदूम (सध्या रा. स्टेशनरोड, जयसिंगपूर) यांनी याबाबत येथील पोलिसात फिर्याद दिली आहे.

रामनगरमधील मराठी शाळेजवळील शंकर हुजरे यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यानी घराचे कुलूप तोडून घरात शिरकाव केला. तर लोखंडी तिजोरीचा दरवाजा उचकटून तिजोरीतील चांदीची भांडी आणि 8 हजार रुपये असा ४८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर या घरालगतच भरत शेडबाळे यांच्या अदित्य फिडस् या पशुखाद्य दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दुकानाला आतून नटबोल्ट लावले असल्याने शटर उघडले नाही. त्यामुळे याठिकाणी चोरीचा प्रयत्न फसला. पोलीसांनी अज्ञाताविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.