इचलकरंजीतील चोरट्यास अटक, दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

0
20

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इचलकरंजीमधील जवाहरनगर येथील स्वामी समर्थ प्रवेशद्वार परिसरात चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आलेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. खेमचंद किसन बुचडे (वय ३०, रा. जवाहरनगर, इचलकरंजी ) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

या चोरट्याकडून रोख रक्कम १५ हजार, ३० ग्रॅम सोन्याचे दागिने,१४६ ग्रॅम चांदीचे दागिने असा १ लाख ५२ हजार ३०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच  शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस उपअधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, पो.अ. रणजित पाटील, अमर शिरढोणे, संजय इंगवले, संजय पडवळ, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर यांनी केली.