चेन हिसकावून पलायन करणाऱ्या चोरट्यास अटक…

0
214

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात १८ ऑगस्ट २०२१ रोजी कारंडेमळा ते कदमवाडी दरम्यान रस्त्यावर मॉर्निंगवाँकला आलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पलायन करणाऱ्या चोरट्यास आज (सोमवार) शिवाजी पेठ-मोरेवाडी दरम्यान अटक करण्यात आली. सागर विश्वास अस्वले (वय ३७ रा. निगवे दुमाला ता.करवीर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याकडून ८१ हजार १२० रुपये किंमतीची सोन्याची चेन आणि गुन्ह्यात वापरलेली ६० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल असा १ लाख ४१ हजार १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शशीराज पाटोळे, सपोनि. सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, रामचंद्र कोळी, सुरेश पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने केली.