…त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसांत शिवसेना मागे पडते : क्षीरसागर

0
343

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आगामी कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज (मंगळवार) येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पराभवाची कारणमीमांसा करून आगामी निवडणुकीत शिवसेनेची रणनीती कशी असेल, याचे संकेत दिले.  

महापालिका निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसांत पैशाची उधळपट्टी होते. आणि त्यावेळी शिवसेना मागे पडते. महापालिका निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर केला जातो. त्यामुळे आम्हीही यावेळी सर्व मार्ग अवलंबणार आहोत, असे क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. काहीजण आपल्या सोयीनुसार राजकारण करतात. त्यांना आम्ही ज्या त्यावेळी उत्तरे दिली आहेत आणि यापुढे देत राहणार आहोत, असे ते म्हणाले.