विशेष ( प्रतिनिधी ) पोलिासांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नाही की काय ? अशी शंका येणारा धक्कादायक प्रकार सातारा जिल्हा न्यायालय परिसरात आज घडला असून, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे अटकेत आहेत. त्यांना न्यायालयात हजर करताना हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे अटकेत आहेत. खंडणी आणि दरोडा घातल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी कळंबा कारागृहातून अटक केली होती. या आरोपींना दोन दिवसांची न्यायालीयन कोठडी सुनावण्यात आली होती.
यावेळी न्यायालय परिसरात घेऊन जात असताना संशयितांवर गोळ्या झाडण्यात आल्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. गोळीबार होताच सर्वत्र धावपळ उडाली. व या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी न्यायालयाच्या दिशेने धाव घेत पोलिसांनी तातडीने हल्ला करणाऱ्यांना अटक केली आहे.