गुड न्यूज : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट तर १०९४ जणांना डिस्चार्ज

0
409

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारच्या तुलनेत आज (मंगळवार) कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत १७, ०४४ जणांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून पैकी ८५२ जणांचे अहल पॉझिटिव्ह आले आहेत. आजचा जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी दर ४.९९ टक्के आहे. एकूण २० रुग्णांचा मृत्यू झाला असून दिवसभरात १०९४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात १९० तर करवीर तालुक्यात १५८ रुग्ण आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १९०, आजरा – २४, भुदरगड – २०, चंदगड- ७, गडहिंग्लज- ५७, गगनबावडा – ०, हातकणंगले – ९०, कागल – ४१,  करवीर- १५८, पन्हाळा – ५१, राधानगरी – ४६, शाहूवाडी – १५, शिरोळ – ५९, नगरपरिषद क्षेत्र – ८७, इतर जिल्हा व राज्यातील – ७ अशा ८५२ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ८८, ९२२ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ७०, ४७९

मृतांची संख्या – ५, २६४

उपचार सुरू असलेले रुग्ण – १३, १७९