मुख्यमंत्री शिंदेच्या दालनात आनंद दिघे आणि यांचे आहेत फोटो..

0
21

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेमध्ये बंड पुकारून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला असून कामाला लागले आहे. आज मुख्यमंत्री मंत्रालयात पोहोचले आहे. आज त्यांचा मंत्रालयातला पहिलाच दिवस आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील दालनासमोर महिलांनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केले. आज मुख्यमंत्री शिंदेंचा मंत्रालयातला पहिलाच दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दालनाची फुलांनी सजावट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचाही फोटो लावला आहे.