मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ; लोक आडवं करणारच

0
96

मुंबई (प्रतिनिधी) : एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संजय राऊत हे बघून ठेवा. विसरू नका. अति तिथे माती होणारच, अशा शब्दांत ट्विट करून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तो व्हिडिओ पश्चिम बंगालमधील भाजपच्या एका सभेचा असल्याचा दावाही राणे यांनी केला आहे. यात लोकांची मोठ्या प्रमाणत गर्दी दिसत आहे. यावरून राणे यांनी भाजप विरोधकांना सुचक इशारा दिला आहे.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने  बंगालमध्ये जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शनिवारी तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला खिंडार पडले आहे.