…तर शिवसेनेचं सरकार पडू शकतं : कंगना राणावत

0
81

मुंबई (प्रतिनिधी) : माझा अनुभव मला सांगतोय, मनसुख हिरेन प्रकरणात मोठं षडयंत्र रचलं जात आहे, शिवसेना सत्तेत आल्यानंतरच या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जर या प्रकरणाचा योग्य तपास केला गेला, तर आरोपी नक्कीच सापडतील अन् तसं झालं तर शिवसेनेचं सरकार देखील पडू शकते, असा दावा अभिनेत्री कंगना राणावतने केला आहे. 

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई क्राईम बँचचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणावर अभिनेत्री कंगनाने ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. यात तिने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच माझ्याविरोधात आणखी २०० गुन्हे लागू शकतात. याची मला कल्पना असून    मी मानसिक तयारीदेखील केली आहे, असेही तिने म्हटले आहे. दरम्यान, सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर भाजपने वाझेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. या कटात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी नार्को टेस्ट करण्याची मागणी भाजप नेते राम कदम यांनी केली आहे.