…मग भाजपवाल्यांनी वाईनरी, बिअरचे कारखाने बंद करून पाणी विकावं  

0
29

मुंबई (प्रतिनिधी) : सुपर मार्केट, किराणा दुकानातून वाईन विक्री करण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरूवारी परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यावरून आता विरोधी पक्ष भाजपने टीकेची झोड उठवली आहे. या निर्णयाविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. यावरून ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपला खोचक सल्ला दिला आहे.

तुम्हाला विरोधच करायचा असेल, तर भाजप नेत्यांनी आपल्या व कार्यकर्त्यांच्या मालकीचे वाईनरी आणि बिअरचे कारखाने बंद करून पॅकबंद केलेले पाणी विकण्यास सांगा, असा सल्ला क्रास्टो यांनी भाजपला दिला आहे.

सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे महाराष्ट्रातील तुमच्या सर्व भाजप कार्यकर्त्यांच्या मालकीचे वाईनरी आणि बिअरचे कारखाने बंद करून पॅकबंद पाणी विकण्याचा थेट सल्ला क्लाईड क्रास्टो यांनी दिला आहे.