‘त्यांचा’ अंत वाईट असतो : नीलेश राणेंचा रोख कोणाकडे..?

0
289

मुंबई  (प्रतिनिधी)  : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल  जाहीर झाल्यानंतर सर्वात मोठा पक्ष कोणता यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये अहमहमिका सुरू झाली आहे. त्यातच दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे  सुरू झाले आहेत. माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्विट करून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.  

गद्दारी करून ठाकरे सरकारमध्ये बसलेत त्यांना अपेक्षित यश कधीच मिळणार नाही. हेराफेरी करणाऱ्यांना सुरुवातीला यश मिळतं पण त्यांचा अंत वाईट असतो. स्वतःला मोठे जाणते म्हणवून घेणारे आणि आम्हाला सगळं कळतं असं समजणारे नेते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत, असे भाकितही नीलेश राणे यांनी वर्तवले आहे.