आजरा येथील विद्यानगर कॉलनीत १ लाख ८० हजारांची चोरी…

0
631

आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील विद्यानगर कॉलनीत योगेश काकाजी देसाई यांच्या घराची कडीकोयंडा उचकटून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने आणि मुद्देमाल अशी एकूण १ लाख ८० हजारांची चोरी झाल्याची फिर्याद देसाई यांनी आजरा पोलिसात दिली आहे. याबाबत अज्ञातां विरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

आजरा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, देसाई हे कामानिमित्त कोल्हापूर येथे राहतात, त्यांचे मूळ घर विद्यानगर कॉलनी येथे आहे, १८ ते २० ऑक्टोबरच्या दरम्यान घराची कडीकोयंडा उचकटून घरातील रोख ५५ हजार आणि सोन्याचे दागिने अशी एकुण १ लाख ८० हजारांची चोरी झाली आहे. पुढील तपास सपोनि. सुनील हारगुडे करीत आहेत.