राज्य परिवहन महामंडळाच्या स्टोअरमध्ये चोरी : ५० हजारांचा मुद्देमाल लंपास

0
46

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील शिवाजी पार्क येथील राज्यपरिवहन महामंडळाच्या स्टोअर रुमचा अज्ञाताकडून कडीकोयंडा तोडून सुमारे ५० हजारांचा मु्द्देमाल लंपास करण्यात आला. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी पार्क येथील राज्य परिवहन महामंडळाच्या एका स्टोअर रुममध्यें इलेक्ट्रिक साहित्यासह स्लायडिंग खिडक्या, स्विच बोर्ड,असे विविध साहित्य ठेवण्यात आले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास या स्टोअर रूमचा कडीकोयंडा तोडून रूममध्ये प्रवेश करुन येथील इलेक्ट्रिक साहित्य, अल्युमिनिअमच्या सलायडिंग खिडक्या, स्विच बोर्ड,वायर असे विविध साहित्य सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल लपास केला.

दरम्यान, सोमवारी चोरीचा हा प्रकार निदर्शनास येताच परिवहन महामंडळाचे अधिकारी मनोज लिंग्रज यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.