कसबा बावड्यात चोरी : ४७ हजारांचा मुद्देमाल लंपास

0
59

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावड्यात घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञातांने ४७ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा दागिना लंपास केला. याप्रकरणी अमिरबी मेहबूब शेख (रा. नेजदार कॉलनी, गोळीबार मैदान, कसबा बावडा) यांनी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कसबा बावड्यातील शेख कामावर गेल्याचे बघून घरातून अष्टपैलू सोन्याच्या मण्यांची माळ अंदाजे वजन सव्वा तोळे असा ४७ हजार रुपये किंमतीचा दागिना लंपास केला. या प्रकरणी अमीर शेख यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.