कसबा बावड्यात चोरी : १ लाख ९० हजारांची रक्कम लंपास

0
156

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील कसबा बावड्यात असणाऱ्या निवारा कॉलनीमध्ये एका बंद घराचे खिडकीचे गज तोडून अज्ञाताने १ लाख ९० हजारांच्या रोख रक्कमेवर डल्ला मारला. याप्रकरणी अमित संभाजी तहसिलदार (वय ३०, रा. प्लॉट नं. १७ निवारा कॉलनी, कसबा बावडा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कसबा बावड्यातील अमित तहसिलदार हे घरगुती कार्यक्रमासाठी १७ मार्च रोजी आपल्या घराला कुलूप लावून गेले होते. दरम्यान, या संधीचा फायदा घेत एका अज्ञाताने घराच्या खिडकीचे गज तोडून १ लाख ९० हजारांची रोख रक्कम लंपास केली. त्यामुळे अमित तहसिलदार यांनी अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत.