शिरोळ (प्रतिनिधी) : जयसिंगपूर येथील झेले हायस्कूलच्या कार्यालयाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपये लंपास केले. या प्रकरणी मुख्याध्यापक दादासाहेब पांडुरंग पाटील यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अधिक माहिती अशी की, विद्यार्थ्यांच्या बस वाहतुकीसाठी शिक्षकांकडून ही रक्कम जमा करून कार्यालयातील कपाटात ठेवली होती. त्यानंतर चोरट्यांनी कार्यालयाच्या शटरचे कुलूप तोडून कपाटातून रोख रक्कम लंपास केली. अधिक तपास पोलीस करत आहेत.