कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूर युवासेनेच्या वतीने शहर व जिल्ह्यातील युवक व युवतींसाठी आयोजित केलेल्या दांडिया इव्हेंटला उदंड प्रतिसाद मिळाला. या दांडियामध्ये साधारण २००० ते २५०० युवक आणि युवतींनी भाग घेतला होता. विविध गाण्याच्या ठेक्यांवर तरुणाईने नृत्य करीत उत्तरोत्तर दांडियाची रंगत वाढवली.

कार्यक्रमामध्ये लकी ड्रॉ पद्धतीने १५ मुले, १५ मुली तसेच बेस्ट कपल यांना विविध गिफ्ट्सही देण्यात आली. हा इव्हेंट खरी कॉर्नरनजीक कोल्हापूर हायस्कूल येथे पार पडला. आकर्षक विद्युत रोषणाईने दांडिया खेळताना अधिकच बहार आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे भव्य फलक लावण्यात आले होते. युवासेनेतर्फे दरवर्षी हा दांडिया इव्हेंट मोफत घेण्यात, येईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी, युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महिला जिल्हाप्रमुख शुभांगी पवार, शहर समन्वयक हर्षल सुर्वे, उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत, युवासेना शहरप्रमुख वैभव जाधव, समन्व्यक अवदेश करंबे, अमित बाबर, संतोष कांदेकर तसेच युवतीसेनेच्या पूनम पाटील, श्वेता सुतार आदी युवा व युवतीसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.