पुणे (प्रतिनिधी) : देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा हातपाय पसरू लागला आहे. सर्वांना लसीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यातच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड कोरोना लसीला जगभरातून मोठी मागणी होऊ लागली आहे. यावर सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोना लस कधी देणार ? या प्रश्नावर पुनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  आदरणीय देश आणि सरकारे, जसे की तुम्ही लोक कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्याची वाट पाहत आहात. मी तुम्हा सर्वांना विनम्रतेने निवेदन करतो की, तुम्ही सर्वांनी धीर धरावा. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भारतातील कोरोना लसीकरणाच्या गरजांना प्राथमिकता देण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर अन्य देशांच्या मागण्याही पूर्ण करण्यासाठी संतुलन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.