गारगोटी (प्रतिनिधी) : ऑलंपिक गेम्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व ऑलंपिक गेम्स असोसिएशन, ऑलंपिक जिल्हास्तरीय चँपियनशिप २०२१ च्या वतीने पेठवडगांव (हातकणंगले) येथे घेण्यात आलेल्या ऑलंपिक गेम्समध्ये भुदरगड तालुक्याचे नाव लौकीक केले आहे. ८०० मीटर रनिंग स्पर्धेत प्रज्वल प्रकाश खतकर याने तर लांब उडीत संदेश सोनाळकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
साहिल शिवाजी घाटगे याने कबड्डीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याना गोल्डमेडल, ट्रॉफी, सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. हे तीनही विध्यार्थी कुमार भवन करडवाडी हायस्कूलचे असून इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेतात. राज्यस्तरीय होणाऱ्या स्पर्धेत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे तालुक्यातुन कौतुक होत आहे.