शिक्षक समितीचे काम आदर्शवत : हसन मुश्रीफ 

0
49

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिक्षक समितीने केलेले काम आदर्शवत आहे. मला ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले . सर्वांनी कोरोनाचे नियम पाळून कोरोना हद्दपार करूया,  असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री  हसन मुश्रीफ यांनी रुग्णवाहिका प्रदान सोहळ्यात केले.

यावेळी शिक्षण सभापती प्रवीण यादव,  अध्यक्ष अर्जुन पाटील,  सरचिटणीस प्रमोद तौदकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील,  आरोग्य सभापती हंबीरराव पाटील, महिला व बाल कल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती स्वाती सासने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, सरचिटणीस  प्रमोद तौदकर, जि प कर्मचारी चेअरमन राजीव परीट, जिल्हा नेते कृष्णात कारंडे, बँक संचालक सुरेश कोळी, राज्य प्रसिद्धी प्रमुख हरिदास वर्णे, बँक संचालक डी जी पाटील,  राज्य ऑडिटर राजेंद्र पाटील, जोतिराम पाटील, बाजीराव पाटील, राज्य महिला आघाडी अध्यक्षा वर्षा केनवडे, जिल्हा महिला अध्यक्षा दिपाली भोईटे, राज्य नपा/ मनपा प्रमुख सुधाकर सावंत, उमेश देसाई, जि. प. निमंत्रित सदस्य सतीश बरगे, संदीप मगदूम, प्रमोद भांदिगरे, सुकुमार मानकर, शरद केनवडे, गणपती मांडवकर, बाबा खोत, संजय चाळक, सुरेश पाटील, विनायक मगदूम, आनंदा पेंडसे , विनायक अमणगी, आदीसह अनेक तालुका प्रतिनिधी व शिक्षक उपस्थित होते.