टोप (प्रतिनिधी) : कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा उपक्रम सामाजिक दृष्ट्या खूप चांगला आहे. लोकांची सेवा करण्याचे हे काम अभिनंदनास पात्र आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. शिरोली येथे श्री श्रीमंधर कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार राजूबाबा आवळे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, गेल्या वर्षी श्री श्रीमंधर सेंटरमधून सुमारे ५०० कोरोना रुग्ण चांगल्या प्रकारे उपचार घेऊन घरी गेले आहेत. आताही असेच चांगले काम करून कोरोना रूग्णांची सेवा आपल्या हातून व्हावी, अशा अपेक्षा व्यक्त करत  संयोजकाना शुभेच्छा देतो.

यावेळी फारुख देसाई, तालुका आरोग्य अधिकारी सुहास कोरे, शिरोली पोलीस ठाण्याच्या प्रभारी अंबले, पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे, शिरोली ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप गांधी,  लक्ष्मीपुरी जैन श्वेतांबर, ट्रस्ट महावीरनगर, जैन श्वेतांबर ट्रस्ट त्याचप्रमाणे डॉ. निरंजन राठोड, अक्षय बाफना, कोवीड केअर सेंटर जितेंद्र गांधी, भरत ओसवाल, हिम्मत  ओसवाल,  प्रांताधिकारी विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, तलाठी निलेश चौगुले आदी उपस्थित होते.