कसबा बावडा येथील कोविड सेंटरचे काम कौतुकास्पद : आ. ऋतुराज पाटील

0
20

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीत गेली पाच महिने कसबा बावडा येथील पॅव्हेलियन ग्राउंड येथील कोविड सेंटरमधून ९२१ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत. येथील डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार आ. ऋतुराज पाटील यांनी काढले.

या सेंटरमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी अविरत सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आ. पाटील बोलत होते.

यावेळी महानगरपालिकेचे उपयुक्त निखिल मोरे, माजी नगरसेविका माधुरी लाड, अशोक जाधव, मोहन सालपे, सुभाष बुचडे, डॉ. मनाली मिठारी, गजानन बेडेकर, इवाण फार्माचे झोनल मॅनेजर राहुल पोवार, विक्रांत मांजरेकर आदीसह अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.