गंगापूर येथील जयहिंद मंडळाचे कार्य कौतुकास्पद : अर्जुन आबिटकर

0
28

गारगोटी (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे मंडळ म्हणून जयहिंद कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे नाव अग्रेसर आहे, असे गौरवोद्गार प्राचार्य अर्जुन अबीटकर यांनी काढले. गंगापूर (ता. भुदरगड) येथे जय हिंद मंडळाच्या वतीने आयोजित मोफत शासकीय आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात ३०० हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली.

यावेळी गोकुळचे संचालक नंदकुमार ढेगे, बांधकाम व आरोग्य सभापती वंदना जाधव  म. फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे संचालक दत्तात्रय उगले, गोकुळचे संचालक अभिजीत तायशेटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कल्याणराव निकम,  मौनी विद्यापीठचे संचालक बाजीराव चव्हाण, पं.स. सभापती आक्काताई नलवडे, उपसभापती अजित देसाई, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष  अरुणराव जाधव,

राधानगरी तळाशी, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे, शिवाजी ढेगे, गंगापूरच्या सरपंच सीमा कांबळे, मंडळाचे ज्येष्ठ नेते आबासो देसाई, अध्यक्ष जयशिंग उर्फ गोठू जाधव, बळीराजा अकॅडमीच्या अध्यक्षा केतकी पाटील आदी उपस्थित होते.

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजित पाटील यांनी प्रास्तविक केले. तानाजी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. तर रामदास गुरव यांनी आभार मानले.