धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामणी परीसरातील धामणी खोरा बिगर शेती सहकारी पतसंस्थेने अल्पावधीत दैनंदिन व्यवहार, ठेवी, कर्ज पुरवठा यामध्ये नियोजनबध्द कार्य केल्यामुळे ही संस्था ग्रामीण भागातील पतसंस्थांसमोर एक आदर्श निर्माण करत आहे, असे प्रतिपादन केडीसीसी बँक म्हासुर्ली शाखेचे बँकनिरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले. ते या पतसंस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते. प्रमुख उपस्थिती बँक शाखाधिकारी दिलीप स्वामी यांची होती.

पतसंस्थेचे चेअरमन संभाजी पाटील म्हणाले, कामगार आणि सभासदांच्या सहकार्याने एका वर्षात या पतसंस्थेने  चांगला नावलौकीक मिळवला आहे. यापुढे देखील सर्वांनी असेच सहकार्य करावे. यावेळी उपाध्यक्ष, सर्व संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.