पन्हाळा येथील सादोबा तळ्याच्या पश्चिमेकडील भिंत कोसळली…

0
314

पन्हाळा (प्रतिनिधी) : जिल्ह्यात काल (मंगळवार) रात्रीपासून जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे पन्हाळागडावरील सादोबा तळ्याच्या पश्चिमेकडील भिंत कोसळली. मंगळवारी रात्री सुमारे ५० मिमी पाउस झाला. पहिल्याच पावसाने शहरात येताना दिसणाऱ्या सादोबा तलावाची पश्चिमेकडील भिंत पडल्याने तलावाचे नुकसान झाले आहे.