देसाईवाडीत घराची भिंत कोसळली

0
672

कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील बोरगाव पैकी देसाईवाडी येथील तुकाराम गुंडा संकपाळ यांच्या घराची भिंत अतिवृष्टीने कोसळली. त्यामुळे एक लाखाहून अधिक रकमेचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रांपचिक साहित्य व धान्याचे देखील नुकसान झाले आहे. उपसरपंच सागर संकपाळ व मंडल अधिकारी बी. एस. खोत यांनी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.