अन् म्हासुर्लीच्या धनगरवाड्यावरची विकासाची प्रतिक्षा संपली…

0
382

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी येणारे सहा धनगरवाडे स्वातंत्र्याची पंचाहत्तरी पूर्ण व्हायला आली पण तरीही  विकासापासून कोसो दुर होते. दळणवळणाच्या अभावी या वाड्यांनी गेल्या सहा महिन्यात मुख्य रस्त्यावर वेळेवर पोहचता आले नसल्यामुळे दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील यांच्या पाठपुराव्या नंतर पालकमंत्री सतेज यांनी बाजारवाडा फाटा ते मलगुंडे वाडा खडीकरण आणि डांबरीकरणासाठी पंधरा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा धनगर समाज संघटक धोंडीराम मलगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

यावेळी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, संचालक हिंदुराव चौगले, विजयसिंह मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.