‘एकनाथ कुठे आहे’चा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल…

0
574

टोप (प्रतिनिधी) :  राज्यात होणाऱ्या राजकारणातल्या घडामोडीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता जाणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मिडीयावर ‘एकनाथ कुठं आहे’ या ‘धर्मवीर’ सिनेमातील एक व्हिडिओ एडिट करुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणार व्हायरल होत आहे.

यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता प्रसाद ओकच्या तोंडी एक वाक्य आहे की, ‘एकनाथ कुठे आहे ?’ हाच डायलॉग वापरुन त्यापुढे एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यातून विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओचा पाऊस पडायला सुरुवात झाली असुन अनेकांनी हा व्हिडिओ डिपी म्हणून लावला आहे.