सामूहिक बलात्कार करुन पीडितेला रस्त्यावर फेकले

0
60

मुंबई (प्रतिनिधी) : येथील खारघर येथे ३ फेब्रुवारीला दिल्लीतील गाजलेल्या निर्भया प्रमाणेच बलात्काराची घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणतील एका आरोपीला सोमवारी अटक केली. तर दुसरा बसचा चालक असलेला आरोपी मोकाट फिरत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ वर्षाची पीडिता आणि आरोपी हे एकाच इमारतीत राहतात. त्या इमारतीत एक प्री वेडिंग पार्टी सुरु होती. त्यावेळी त्या आरोपीने पीडितेला कोल्ड्रिंक देऊ केले. त्यात आरोपीने गुंगीचे औषध मिसळले होते. खारघर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस विवेक भोईर यांनी सांगितले की, पार्टीदरम्यान, पीडित महिलेला तहान लागली त्यावेळी ती पाणी पिण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपीने त्या महिलेला बाजूला बोलवून कोल्ड्रिंक ऑफर केले. आरोपी हा त्या महिलेच्याच बिल्डिंगमध्ये राहत असल्याने पीडितेनेही त्याच्यावर संशय न घेता ते कोल्ड्रिंक घेतले. ज्यावेळी पीडितेला गुंगी येत होती त्यावेळी आरोपींनी तिला अजून गुंगीचे औषध मिसळलेले ड्रिंक पाजले. ज्यावेळी ती पीडिता जवळपास बेशुद्ध झाली त्यावेळी आरोपींनी तिला बसमध्ये नेले आणि सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करुन झाल्यानंतर त्यांनी पीडितेला रस्त्यावर फेकून दिले आणि तिचा मोबाईल काढून घेत घटनास्थळापासून पळ काढला.